Election Commission Of India: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, BMC आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांना हटवलं

Election Commission Of India: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांना हटवलं

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दणका दिला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दणका दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांना हटवण्याचे आदेश महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभाग व मुख्य सचिवांना दिले आहेत.

तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील जीएडी (GAD) चे सचिव त्यांनाही हटवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्ष पूर्ण झाला आहे किंवा ते त्यांच्या गृह जिल्ह्यांत कार्यरत आहेत त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, असा आदेश निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिला आहे. मात्र कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात न्यायालयाने सहमती दर्शवली नाही. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय निवडणूक आयोगाने इक्बाल सिंह चहल यांची बदली करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.

चहल हे ते चार वर्षे ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि चार वर्षे औरंगाबादचे जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक होते. कोरोना काळात त्यांच्यावर मुंबईची जबाबदारी देण्यात आली. चहल यांच्या कामकाजाचा अनुभव कोविड काळात मुंबईकरांसाठी वरदान ठरला. त्यांच्या उपाय योजनांमुळे मुंबई कोविड काळात सावारण्यात मोठी मदत झाली. अनेक स्तरांतून त्यांच्या कामकाजाचे कौतुक करण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com