Special Report On Dog Tax : तुम्हीही कुत्रा पाळण्याचा विचार करतायं का ?; मग 'ही' बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची
घरात कुत्रा, मांजर पाळणे हे काही नवीन नाही. कित्येकांच्या घरामध्ये सर्रास पाळीव प्राणी पाळले जातात. मात्र आता पाळीव प्राणी पाळण्यावर टॅक्स लावला जाणार आहे. इतकेच नव्हे तर त्यासाठी परवानगीही घ्यावी लागणार आहे. मात्र हे नियम केवळ कुत्रा पाळण्यावरच लावण्यात आले आहेत.
अनेक जणांना कुत्रा पाळण्याची आवड असते. आता कुत्रा पाळण्यासाठी परवाना काढावा लागणार आहे. तर, कुत्रा पाळणाऱ्या पालकांना वार्षिक टॅक्सही भरावा लागणार आहे. अनेक जणांच्या घरात तर दोन-दोन, तीन-तीन कुत्रे असतात. परंतू, आता घरात कुत्रा पाळण्यासाठी मुंबई महापालिकेने नवे नियम जाहीर केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे कुत्रा सांभाळण्यासाठी आता वार्षिक टॅक्सही भरावा लागणार आहे. शिवाय, कुत्रा पाळत असाल तर त्याची तातडीने महापालिकेकडे नोंदणी करणेही आवश्यक आहे.
काय आहेत नियम -
कुत्रा पाळण्यासाठी महापालिकेचा परवाना गरजेचा
कुत्रा पाळताना महापालिकेकडे नोंदणी करावी लागणार
एमएमसी कायदा 1888 नुसार सेक्शन 191 बीचा परवाना
परवान्याशिवाय कुत्रा पाळणं बेकायदेशीर समजलं जाणार
ॲनिमल वेलफेर बोर्ड ऑफ इंडियाची परिपत्रकं बंधनकारक
पाळलेल्या कुत्र्यांची संख्या महापालिकेला कळवावी लागणार
कुत्रा पाळण्यासाठी महापालिका वार्षिक 100 रुपये टॅक्स घेणार
कुत्रा पाळण्यास सोसायटी मज्जाव करू शकणार नाही