Bobby Deol Break Down After Meet Dharmendra
Bobby Deol Break Down After Meet DharmendraBobby Deol Break Down After Meet Dharmendra

Bobby Deol Break Down After Meet Dharmendra : वडीलांना रुग्णलयात भेटून आल्यावर बॉबी देओलचे डोळे पाणावले...

धर्मेंद्र यांची भेट घेऊन रुग्णालयातून बाहेर पडताना बॉबी देओल अत्यंत भावूक अवस्थेत दिसला. पॅपाराझींनी टिपलेल्या व्हिडिओमध्ये तो डोळ्यांत अश्रू घेऊन हातात टिश्यू पेपर धरलेला दिसतो.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Bobby Deol Break Down After Meet Dharmendra) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाढत्या वयासोबत उद्भवलेल्या आरोग्य समस्यांमुळे त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समजताच चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी धर्मेंद्र यांच्या भेटीसाठी देओल कुटुंबासह अनेक नामांकित कलाकार रुग्णालयात पोहोचले. त्यामध्ये सनी देओल, बॉबी देओल, हेमा मालिनी आणि ईशा देओल यांचा समावेश होता. तसेच सलमान खान, शाहरुख खान आणि गोविंदा यांसारख्या स्टार्सनाही धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी येताना पाहण्यात आले.

वडिलांना भेटून बाहेर पडताना बॉबी देओलचा हळवा क्षण

धर्मेंद्र यांची भेट घेऊन रुग्णालयातून बाहेर पडताना बॉबी देओल अत्यंत भावूक अवस्थेत दिसला. पॅपाराझींनी टिपलेल्या व्हिडिओमध्ये तो डोळ्यांत अश्रू घेऊन हातात टिश्यू पेपर धरलेला दिसतो. कॅमेरे त्याच्याकडे वळलेले पाहून त्याने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या चेहऱ्यावरची वेदना आणि असहायता स्पष्ट जाणवत होती. हा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांनी “याचं असं रडणं पाहवत नाहीय...” अशी भावना व्यक्त केली. अनेकांनी बॉबीसाठी आणि धर्मेंद्र यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना व्यक्त केल्या.

एका चाहत्याने लिहिले, “जिस मर्द के आंसू जल्दी आ जाएं वो कमजोर नहीं होता…”, तर दुसऱ्याने म्हटलं, “तो आपल्या आजारी वडिलांसाठी रडतोय, त्याचं रडणं प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेलं.” काहींनी माध्यमांनाही आवाहन केलं “कृपया अशा क्षणी या कुटुंबाला एकटं राहू द्या.”

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत सनी देओल टीमचं स्पष्टीकरण

सोशल मीडियावर धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची अफवा पसरल्यानंतर, सनी देओलच्या टीमनं त्या बातम्यांना खंडन केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं, “धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी.”

सहा दशकांचा सुपरस्टार प्रवास

धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात 300 हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे.

1960 साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर ‘फूल और पत्थर’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘धरमवीर’, ‘राजा जानी’, ‘गुलामी’, ‘प्रतिज्ञा’, ‘बर्निंग ट्रेन’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अमिट स्थान निर्माण केलं.

2012 साली भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.

पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धर्मेंद्र

वयाच्या उत्तरार्धातही धर्मेंद्र सक्रिय आहेत. ते लवकरच मॅडॉक फिल्म्सच्या ‘इक्कीस’ या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. याआधी त्यांनी ‘अपने’, ‘यमला पगला दीवाना’ आणि ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ अशा चित्रपटांत झळकून आपल्या अभिनयाची छाप कायम ठेवली.

चाहत्यांची एकच प्रार्थना

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणताही अधिकृत वैद्यकीय बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी आणि टीमने दिलासा देणारी माहिती दिल्याने थोडा दिलासा मिळालाय. दरम्यान, सोशल मीडियावर चाहत्यांकडून “गॉड ब्लेस धरम पाजी”, “लव यू धरम जी, गेट वेल सून” असे संदेश मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com