ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वर पदाचा राजीनामा, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, "या पदासाठी मी चार कोटी रुपये..."
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी महाकुंभ मेळ्यामध्ये त्यांनी संन्यास घेतला. यावेळी त्यांना किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर ही पदवी मिळाली. मात्र काही दिवसांतच त्यांची या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये काय म्हणाल्या ममता कुलकर्णी?
मी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देत आहे. मी लहानपणापासूनच साध्वी आहे आणि यापुढेही राहीन. मला महामंडलेश्वर म्हणून जो काही सन्मान मिळाला आहे. मी यासाठी 25 वर्ष साधना केली आणि आणि मुलांना समजावणं हीदेखील माझीच जबाबदारी आहे. पण महामंडलेश्वर झाल्यानंतर काही लोकांनी नाराजी दर्शवली आहे. मी 25 वर्षांपूर्वीच बॉलिवूड सोडलं आहे. त्यानंतर प्रत्येक गोष्टीपासून मी स्वतःला दूर ठेवलं आहे. मी जे काही करते त्यावर नेहमीच लोकांच्या प्रतिक्रिया येतात.
नंतर त्या म्हणाल्या की, "महामंडलेश्वर पदासाठी मी चार कोटी रुपये दिले असे म्हंटले गेले. पण दक्षिणा म्हणून देण्यासाठी माझ्याकडे 2 लाख रुपयेदेखील नाहीत. ज्यांनी माझ्या पदावर आपत्ती दर्शवली आहे त्यांच्याबद्दल मी कमी बोललेलं चांगलं. माझ्याकडे कोणालाही द्यायला कोट्यावधी रुपये नाहीत.