घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन, म्हणाला, "मी तिला..."
सध्या बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आला आहे. 90 च्या दशकामध्ये गोविंदाने त्याच्या अभिनयाने चाहत्यांची मने अधिक जिंकून घेतली होती. मात्र सध्या त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे त्याच्याबद्दल अधिक चर्चा केली जात आहे. लग्नाची 37 वर्षांनी संसार मोडणार असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. मात्र या सगळ्या चर्चांवर गोविंदाने मौन सोडले आहे. गोविंदा व सुनीता दोघंही वेगवेगळे राहत आहेत.
गेला अनेक काळ गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा हे एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणामुळे घटस्फोट असल्याचेही म्हंटले जाऊ लागले. मात्र याबद्दल आता स्वत: गोविंदाने मौन सोडले आहे. तो काय म्हणाला? हे जाणून घेऊया.
घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाची प्रतिक्रिया :
'ई-टाइम्स' बरोबर संवाद साधताना घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदा म्हणाला की, "मी याबद्दल सुनीताला मेसेज केला आहे. पण तिने अद्याप रिप्लाय दिला नाही". मात्र त्याने त्याच्या व्यवसायाबद्दल चर्चा केली. तो म्हणाला की, "सध्या फक्त बिजनेसबद्दलच्या चर्चा सुरु आहेत. मी माझे नवीन चित्रपट तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे".
गोविंदाच्या या वक्तव्यामुळे आता संभ्रम अधिकच वाढला आहे. त्यामुळे खरच सुनीता आणि गोविंदाचा घटस्फोट होणार का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. तसेच सुनीता यांनीदेखील या घटस्फोटाच्या प्रकरणावर खुलेपणाने भाष्य केलेले नाही.