Salman Khan Social Media Post : धमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया समोर, वेधले सगळ्यांचे लक्ष
सलमान खानला काल पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली. बॉम्बने सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी पोलिसांना आलेली आहे. वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅपवर हा धमकीचा मेसेज आलेला आहे. त्यावरून वरळी पोलिसात धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला सातत्याने धमक्यांचे फोन मेसेज येत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या घराबाहेर हल्ला देखील झाला होता. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेतदेखील वाढ करण्यात आलेली होती.
असं असतानाच आता पुन्हा एकदा सलमान खान याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी वरळी वाहतूक पोलिसांना मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकणावर सलमान खानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्याने जीममधील काही फोटो शेअर केले आहेत . हे फोटो शेअर करत त्याने 'Thank You For Motivation' असे कॅप्शन दिले आहे. सलमानच्या या फोटो आणि कॅप्शनकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.