Dharmendra Property : धर्मेंद्रच्या 450 कोटींच्या वारशावर हेमा मालिनींचा मोठा खुलासा

Dharmendra Property : धर्मेंद्रच्या 450 कोटींच्या वारशावर हेमा मालिनींचा मोठा खुलासा

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब भावनिकदृष्ट्या कोलमडून गेलं आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी या दिग्गज कलाकारानं अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या तब्बल 450 कोटींच्या मालमत्तेबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Dharmendra Property) धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब भावनिकदृष्ट्या कोलमडून गेलं आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी या दिग्गज कलाकारानं अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या तब्बल 450 कोटींच्या मालमत्तेबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. धर्मेंद्र यांना एकूण सहा अपत्यं असून, ही संपत्ती कोणाच्या नावावर जाणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्या अस्तित्वातच मुस्लीम धर्म स्वीकारून हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं होतं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या संसारात ईशा आणि अहाना या दोन मुलींचा जन्म झाला. मात्र याआधीच धर्मेंद्र प्रकाश कौर यांच्यासोबत चार मुलांचे वडील होते.

हेमा मालिनींचं जुने वक्तव्य पुन्हा चर्चेत

1980 साली धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी समाजाच्या विरोधात जाऊन विवाह केला. या निर्णयामुळे हेमा मालिनी यांच्यावर टीकेची झोड उठली, पण दोघांनीही आपलं नातं टिकवण्यासाठी सर्वांचा विरोध सहन केला. विशेष म्हणजे, आजतागायत हेमा मालिनी कधीही धर्मेंद्र यांच्या मूळ घरात गेल्याचं दिसलं नाही, तसेच त्यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळीदेखील त्या उपस्थित नव्हत्या. भूतकाळात दिलेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या संपत्तीबद्दल स्पष्ट मत मांडले होते. त्या म्हणाल्या होत्या. “आमच्या लग्नानंतर अडचणी येणार हे मला आधीपासून माहित होतं… पण मला त्यांचं प्रेमच महत्त्वाचं वाटलं. पैशासाठी किंवा प्रॉपर्टीसाठी मी कधीच त्यांच्या आयुष्यात आले नाही. मला त्यांच्याकडून केवळ आपुलकीची अपेक्षा होती.”

मग वारसा कोणाच्या नावावर जाईल?

कायद्याच्या दृष्टीनं पाहिल्यास, हिंदू विवाह कायद्यानुसार पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न झाल्यास दुसरा विवाह वैध मानला जात नाही. तरीदेखील, या प्रकारच्या परिस्थितीत दोन्ही विवाहांतील मुलांना वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क असतो. म्हणजेच धर्मेंद्र यांची संपत्ती पत्नींना नव्हे, तर सर्व सहा मुलांमध्ये समान प्रमाणात वाटली जाईल. दोन्ही पत्नींबाबत मात्र एक गोष्ट शक्य आहे. त्या परस्पर समझोत्याने विशिष्ट मालमत्तेबाबत निर्णय घेऊ शकतात. कारण कायदेशीरदृष्ट्या पहिली पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न मान्य नसल्याने, संपत्तीविषयक कुठलीही व्यवस्था दोन्ही बाजूंच्या संमतीने ठरू शकते.

थोडक्यात

  • (Dharmendra Property) धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब भावनिकदृष्ट्या कोलमडून गेलं आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी या दिग्गज कलाकारानं अखेरचा श्वास घेतला.

  • त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या तब्बल 450 कोटींच्या मालमत्तेबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  • धर्मेंद्र यांना एकूण सहा अपत्यं असून, ही संपत्ती कोणाच्या नावावर जाणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com