कतरिना कैफची मनोभावे गंगापूजा, सासूबाईंबरोबर भक्तीत तल्लीन
प्रयागराज येथील सुरु असलेला महाकुंभमेळ्याची लवकरच सांगता होणार आहे. या महाकुंभमेळ्यामध्ये आजवर अनेकांनी हजेरी लावली आहे. देश-विदेशातून अनेक भाविकांनी कुंभमेळ्यामध्ये उपस्थिती दर्शवली होती. अनेक राजकीय नेते, कलाकार महाकुंभमेळ्यामध्ये उपस्थित होते. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री कातरिना कैफही महाकुंभमेळ्यामध्ये दिसून आली. कतरिना तिच्या सासूबाईंबरोबर दिसून आली.
कतरिना प्रयागराज इथं दाखल झाल्यानंतर तिनं परमार्थ निकेतन शिविर इथं स्वामी चिदानंद सरस्वती आणि साध्वी भगवती सरस्वती यांचे आशीर्वाद घेतले. तसेच कतरिना आणि तिच्या सासूबाईंनी साध्वी भगवती यांच्यासोबत संवादही साधला. यानंतर कतरिनानं एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली की, "मी खूप खुश आहे. तिने येण्याचं भाग्य मला मिळालं".
पुढे ती म्हणाली की, "मी चिदानंद सरस्वती यांची भेट घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला. मी इथं एक वेगळा अनुभव घेत आहे. मला इथं एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा दिसतेय, इथल्या प्रत्येक गोष्टीत एक सौंदर्य आहे, प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. या प्रत्येत गोष्टीचं महत्त्व आहे, आजचा दिवस इथं घालवण्यासाठी मी उत्सुक आहे". दरम्यान तिचा नंतर एक व्हिडीओदेखील समोर आला होता.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कतरिना भजन कीर्तन करताना दिसत आहे. तसेच यामध्ये मनोभावे पूजा करताना तल्लीनदेखील झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.