हनी सिंगने पुण्यातील कॉन्सर्टमध्ये गायले दादा कोंडकेंचं गाणं, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हनी सिंगने पुण्यातील कॉन्सर्टमध्ये गायले दादा कोंडकेंचं गाणं, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

यामध्ये तो चक्क मराठी गाणं गाताना दिसत आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

नुकताच पुण्यामध्ये पंजाबी गायक हनी सिंगचा कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टआधी या ठिकाणी गर्दीमध्ये गोंधळ झाल्याने पोलिसांना प्रेक्षकांवर लाठीचार्जदेखील करावा लागला. मात्र या कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हनी सिंगच्या एका गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो चक्क मराठी गाणं गाताना दिसत आहे.

हनी सिंगची सगळीच गाणी प्रसिद्ध होतात. खूप वर्ष मनोरंजन क्षेत्रापासून लांब होता. मात्र त्याचा आता कमबॅक झालेला दिसून येत आहे. नुकताच त्याचा पुण्यामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. यावेळी त्याने पंजाबी आणि हिंदी गाण्याबरोबर मराठी गाणं गात चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. हनी सिंगने मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांचे 'ढगाला लागली कळं' हे आयकॉनिक गाणे गायले आहे. मंचावर हे गाणे गाताच तेथील उपस्थितांनीदेखील त्याच्या सुरात सुर मिसळलेला दिसून आला. दरम्यान हे गाणं गाण्याआधी त्याने चाहत्यांशी मराठीमध्येही संवाद साधला.

हनी सिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळताना बघायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com