Akshay Kumar : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा जुहू येथे भयंकर कार अपघात

Akshay Kumar : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा जुहू येथे भयंकर कार अपघात

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या गाडीचा मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीने थेट पलटी मारली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या गाडीचा मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीने थेट पलटी मारली. अक्षय कुमार पत्नीसोबत विमानतळावरून जुहू येथील बंगल्याकडे निघाला होता. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा जुहू येथील बंगल्याकडे जात असताना मोठा कार अपघात घडला. हा अपघात इतका भयंकर होता की, एका मर्सिडीज कारने पलटी मारली. अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी विमानतळावरून त्यांच्या घराकडे निघाले होते आणि दोघेही एका कारमध्ये होते. त्यांच्या गाडीच्या मागे सुरक्षारक्षकांची गाडी होती.

याच दरम्यान, एक मर्सिडीज कारचे चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्या कारने आधी एका ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही मर्सिडीज अक्षय कुमारच्या सुरक्षारक्षकांच्या कारला धडकली, ज्यामुळे ती गाडी रस्त्यावर पलटी झाली. अपघाताच्या वेळी अक्षय कुमार असलेल्या कारलाही हलकी धडक बसली असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या गाडीचे फारसे नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षारक्षकांच्या कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अपघातात जखमी झालेल्या ऑटो चालकाला तात्काळ मदत करण्यात आली. विशेष म्हणजे, अक्षय कुमार यांनी स्वतः त्यांच्या सुरक्षारक्षकांना ऑटो चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या ऑटो चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी अपघाताचे व्हिडीओ मोबाईलमध्ये टिपले असून, हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अपघातानंतर काही वेळाने अक्षय कुमार तेथून निघून गेले, मात्र त्यांचे सुरक्षारक्षक घटनास्थळी उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणतीही एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. अपघात नेमका मर्सिडीज चालकाच्या चुकीमुळे झाला की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अक्षय कुमार किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. शूटिंग संपवून घरी जात असतानाच हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com