होळीनिमित्त आक्षेपार्ह जाहिरात केल्याने ट्विटरवर #boycottswiggy होतेय ट्रेंड
Admin

होळीनिमित्त आक्षेपार्ह जाहिरात केल्याने ट्विटरवर #boycottswiggy होतेय ट्रेंड

लोकप्रिय फूड डिलिव्हरी कंपन्यांपैकी एक असलेले स्विगी चांगलीत चर्चेत आली आहे.

लोकप्रिय फूड डिलिव्हरी कंपन्यांपैकी एक असलेले स्विगी चांगलीत चर्चेत आली आहे. या कंपनीमुळे अनेक जणांना आपली भूक भागवता येते. अनेकजणांना यामुळे रोजगार मिळतो.

नुकतीच स्विगीची एक जाहीरात चांगलीच व्हायरल होत आहे. होळीच्या दिवशी सोशल मीडियावर एक जाहीरात शेअर करण्यात आली त्यामुळे आता वाद निर्माण होत आहे. होळी निमित्त स्विगी कंपनीच्या काही होर्डिंग्स लावण्यात आले होते. होळीच्या दिवशी कोणाच्याही अंगावर अंडयाचा वापर फोडण्यासाठी करु नये तर अंड्याचा वापर जेवणात करावा, #बुरा मत खेलो असे त्या होर्डिंग्सवर लिहिण्यात आले होते. यावरुन आता वाद निर्माण होत आहे.

स्विगीच्या या जाहीरातीला हिंदू विरोधी म्हटले जात आहे. ट्विटरवर #HinduPhobicSwiggy हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. या प्रकरणावर कंपनीने अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ट्विटर सध्या #boycottswiggy हा चांगलाच ट्रेंड होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com