Brahmapuri Temperature : विदर्भात उष्णतेची लाट, ब्रह्मपुरी बनले जगातील आठव्या क्रमांकाचे उष्ण शहर
राज्यामध्ये सर्वाधिक तापामानाची नोंद चंद्रपूर मधल्या ब्रह्मपुरी इथे करण्यात आलेली आहे. ब्रह्मपुरीतल तापमान 42.2 अंश सेल्सियस नोंदवल गेलेल आहे. तर चंद्रपूरमधलं तापमान 41.6 अंश सेल्सियस इतक नोंद करण्यात आलय हवामान खात्यानुसार पुढच्या काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर अकराव्या तर अकोला व चंद्रपूर अनुक्रमे चौदाव्या व पंधराव्या क्रमांकावर आहे. राज्यामध्ये सर्वाधिक तापामानाची नोंद असलेले शहर चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी हे आहे. तसेच ब्रह्मपुरी शहर गुरुवारी जगातील आठव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. गुरुवारीच्या तापमानावरुन ब्रह्मपुरी येथे ४२.२, प्रयागराज येथे ४२, नागपुरात ४१.९, अकोला येथे ४१.७ आणि चंद्रपुरात ४१.६ अंश तापमान होते. विदर्भातील गोंदिया (३९.५ अंश) व बुलढाणा (३७.३ अंश) वगळता सर्वच जिल्ह्यांमधील तापमान ४० अंशांहून अधिक होते.