पुणे शहराचे नामांतराच्या वादात ब्राह्मण महासंघाची उडी

पुणे शहराचे नामांतराच्या वादात ब्राह्मण महासंघाची उडी

पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. या नामांतराच्या वादावरून संपूर्ण पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विट करून पुण्याच्या नामांतराची मागणी केली. पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार आहे, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. यावर विरोध दाखवत दवेंनी पुण्याच्या नामांतराची गरज नसल्याचे म्हटले आहे. जिजाऊंच भव्य आणि वेगळं स्मारक उभारा. ते लाल महाल येथे उभारा. पुण्याचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. राजमाता या सर्वांनाच वंदनीय आहेत. पुण्याचे आणि त्यांचे नाते सुद्धा आहे. पण पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवामुळे पडले आहे. ते बदलण्याची गरज नाही असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com