Rahul Gandhi
Rahul GandhiRahul Gandhi

Rahul Gandhi : राहूल गांधीच्या हरियाणा मतचोरीच्या आरोपावर ब्राझीलच्या 'त्या' मॉडेलची प्रतिक्रिया म्हणाली...

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेतली. हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

"सध्या आगमी निवडणुकांचं वारे जोरात वाहतायत... विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका आणि आरोपांची सरबत्ती सुरू आहे. त्यामध्येच आता राहुल गांधींनी एक नवीन राजकीय बॉम्ब टाकला आहे! राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये ब्राझीलमधील एका मॉडेलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेतली. हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला. हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाली, असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. राहुल यांनी पुरावा म्हणून एक वोटर आयडी कार्ड दाखवलं. एका ब्राझीलियन मॉडेलच्या फोटोचा वापर करुन अनेक ठिकाणी मतदान झालं असा दावा राहुल गांधी यांनी केला. पण आता या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.

राहुल गांधींच्या आरोपांनंतर या मॉडेलच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय! त्या ब्राझीलियन मॉडेल प्रतिक्रिया देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती म्हणाली की, मला भारतीय पत्रकारांसाठी एक व्हिडीओ बनवण्यास सांगण्यात आले होते. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. माझा भारतीय राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी कधीही भारतात गेले नाही. मी एक ब्राझिलियन मॉडेल आहे. मला भारतीय लोक आवडतात. खूप खूप धन्यवाद. नमस्ते..., असं लारिसा म्हणाली. हे संपूर्ण प्रकरण खूप गंभीर झाले आहे. काही भारतीय पत्रकार माझ्याकडून माहिती मागत आहेत. पहा, मी येथे आहे. काही भारतीय पत्रकार मला शोधत आहेत आणि माझी मुलाखत घेऊ इच्छितात. मित्रांनो, मी सर्वांना मुलाखती दिल्या आहेत, प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. माझा फक्त फोटो वापरण्यात आला, असंही लारिसाने सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com