Viral News : मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याच्या एका वाक्याने सगळंच चित्र बदललं; ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल
(Viral News) उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा आरोप नवविवाहितेने केला आहे. यानंतर तिने सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी त्रास दिला आणि घराबाहेर काढल्याचाही दावा केला आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसांकडे दाद मागितली असून तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चकेरी भागात राहणाऱ्या तरुणीचा विवाह 1 मे 2025 रोजी सीसामऊ परिसरातील एका तरुणाशी झाला होता. लग्नानंतर पहिल्याच रात्री पतीकडून वैवाहिक नातेसंबंध प्रस्थापित न झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने ही बाब सासू-सासऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी दोन लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याचा आरोप आहे.
महिलेने हुंडा देण्यास नकार दिल्यावर तिला मारहाण करण्यात आली, असा दावा तिने केला आहे. या घटनेनंतर तिने आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला. काही दिवसांनी तिचे आई-वडील सासरी गेले असता, त्यांच्याकडेही पैशांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
नंतर महिलेची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आले. पतीवर वैद्यकीय उपचार करण्यात आले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, असे महिलेचे म्हणणे आहे.
यानंतर हुंडा न दिल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढले. अखेर पीडित महिलेनं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

