मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये ८ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये ८ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई सेंट्रल, करी रोड, सँडहर्स्ट रोड, मरीन ड्राईव्ह, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड रोड, किंग सर्कल या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांच्या नवीन नावांबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.

राहुल शेवाळे यांनी या रेल्वे स्थानकांची नावे पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवली होती. राहुल शेवाळे यांनी पत्रात नामांतर करण्यामागची कारण सांगितलं होतं. या आठही रेल्वे स्थानकांना ब्रिटीश कालीन नावं आहेत. तसेच राहुल शेवाळे यांनी रेल्वे स्थानकांसाठी नावे देखील सूचवली होती. त्यांच्या या विनंतीस आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

'या' ८ रेल्वे स्थानकांच्या नामांतराला मंजूरी

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव जगन्नाथ शंकर सेठ असे केले जाणार आहे.

करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग असे केले जाणार आहे.

सँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी' असे केले जाणार आहे.

मरीन ड्राईव्हचे नाव मुंबा देवी असे केले जाणार आहे.

चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे गिरगाव असे केले जाईल.

कॉटन ग्रीनचे नाव काळाचौकी असे केले जाईल.

डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचे नाव माझगाव असे केले जाणार आहे.

किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तिर्थकर पार्श्वनाथ असे केले जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com