पोलिसांची थेट देशाच्या पंतप्रधानांवरच मोठी कारवाई; वाचा कारवाई मागचं कारण

पोलिसांची थेट देशाच्या पंतप्रधानांवरच मोठी कारवाई; वाचा कारवाई मागचं कारण

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या नॉर्थ वेस्टच्या प्रवासादरम्यान इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला,

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या नॉर्थ वेस्टच्या प्रवासादरम्यान इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, यामध्ये सुनक यांनी चालत्या कारमधील सीट बेल्ट काढला आहे. त्यामुळं पोलिसांनी आपल्याच पंतप्रधानांना वाहतूक नियमांचं उल्लंघन ठरवत दंड ठोठावला आहे.

त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ऋषी सुनक यांना पोलिसांनी हा दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ऋषी सुनक यांच्यावर तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह कोविड-19 लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला होता. बोरिस जॉन्सननंतर अशाप्रकारे कायदा मोडणारे ऋषी सुनक हे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

हा व्हिडिओ पोलिसांनी पाहिल्यानंतर वाहतूक पोलिसांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल,

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com