Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team Lokshahi

Broder Dispute : कर्नाटकनं हे सर्व थांबवावं, क्रियेला प्रतिक्रिया नको; देवेंद्र फडणवीस

राज्यात सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा गोंधळ सुरु आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर वक्तव्यासोबत कृत्य देखील होत आहे.
Published by :
shweta walge

राज्यात सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा गोंधळ सुरु आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर वक्तव्यासोबत कृत्य देखील होत आहे. मात्र महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झालेत तर महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले, ''महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे जे कुणी वाहनं रोखण्यासारखा प्रकार करतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील''.

पुढे ते म्हणाले, ''महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना कायदा हातात घेणं योग्य नाही. तर शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील ४८ तासात कर्नाटकमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. मात्र महाराष्ट्रातील नागरिकांना माझी विनंती आहे क्रियेला प्रतिक्रिया दिली तर हे प्रकार वाढतील. त्यामुळं तसं करु नये. पण कर्नाटकच्या सरकारची देखील तेवढीच जबाबदारी आहे त्यांनी महाराष्ट्राच्या लोकांवर अन्याय करु नये, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

Devendra Fadnavis
"अशा गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी" सुधीर मुनगंटीवार यांचा कर्नाटक सरकारला इशारा

''महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं अश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिलं आहे. तसेच या सर्व प्रकरणाबाबत आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली असून त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांना कर्नाटकमध्ये संरक्षण दिलं जाईल, असं अश्वासन देखील दिलं आहे'', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com