Thane : ठाण्यात बसपा-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने; घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thane ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत.
यातच काल ठाण्यात बसपा आणि शिवसेना कार्यकर्ते समोरा समोरा आल्याने तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. ठाण्यातील वागळे विभागामध्ये बसपा आणि शिवसेनेच्या प्रचारा दरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने वातावरण तापले होते.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांचे असंख्य कार्यकर्ते प्रचार करत असताना हा मोठा गोंधळ निर्माण झाला. घटनास्थळी श्रीनगर पोलिसांचा मोठा फौज फाटा लावण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
Summary
ठाण्यात बसपा-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने
ठाण्यातील वागळे विभागामध्ये तणावाचे वातावरण
घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा
