Buldhana Accident
Buldhana AccidentTeam Lokshahi

Buldhana Accident : राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ वर दोन ट्रकचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

बुलढाणा येथे एक मोठी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे.
Published by :
shweta walge

बुलढाणा येथे एक मोठी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ वर तांदुळवाडी पुलावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ वर तांदुळवाडी पुलावर विटांनी भरलेला एक ट्रक जात होता. समोरुन येणाऱ्या दुसऱ्या ट्रकची या ट्रकला जोरात धडक बसली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत तर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जखमींना मलकापूर येथे कुटीर रुग्णालय हलविण्यात आलं आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या भीषण अपघातात विटांनी भरलेल्या ट्रकचा पुढील भाग चिरडला गेला. ट्रकला समोरून जोरात धडक बसल्याने समोरील काचा फुटल्या तसेच ट्रक वाहन चालकाचा यात जागीच मृत्यू झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com