ताज्या बातम्या
Buldhana News : धक्कादायक! नवरा-बायकोच्या भांडणाने घेतला चिमुकल्याचा जीव, नेमकं प्रकरण काय?
बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंढेरा ठाण्यातील हद्दीत जन्मदात्या बापानेच आपल्या दोन जुळ्या मुलींची गळा चिरुन हत्या केली.
बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंढेरा ठाण्यातील हद्दीत जन्मदात्या बापानेच आपल्या दोन जुळ्या मुलींची गळा चिरुन हत्या केली. नवरा- बायकोच्या वादातून ही घटना घडली आहे. या घटनेमुळे बुलढाणा जिल्हा हादरला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथे बापाने आपल्या पोटच्या दोन निरागस मुलींचा अमानुष पने गळा चिरून खळबळजनक घटना घडल्याने परिसर हादरून गेला आहे राहुल चव्हाण हे आरोपी चे नाव असून तो पुण्याला एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे नवरा बायकोचे भांडण झाल्यामुळे रागात ही घटना घडली अंढेरा जवळील जंगलात त्याने आपल्या अडीच आणि तीन वर्ष चे मुलीचा गळा चिरून खून केला ही घटना 21 ऑक्टोबर रोजी घडली जी आज 25 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली असल्याची माहिती अंढेरा पोलिसांनी दिली आहे.
