bus accident on old pune mumbai highway bus fallen in borghat valley raigad accident news and updates
bus accident on old pune mumbai highway bus fallen in borghat valley raigad accident news and updates

Bus Accident : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर बोरघाटात बस दरीत कोसळली; 12 जणांचा मृत्यू तर 28 जण जखमी

आताची सर्वात मोठी बातमी जुन्या पुणे-मुंबई हायवेवर बोरघाटात बस कोसळल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

रायगड : भारत गोरेगावकर | मुंबई पुणे जुन्‍या महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात खाजगी बस दरीत कोसळून झालेल्‍या अपघातात 12 जणांचा मृत्‍यू झाला आहे तर 28 जण जखमी झाले आहेत. जखमींवर खोपोलीच्‍या पालिका रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना कोमोठे येथील एमजीएम रूग्‍णालयात हलवण्‍यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्‍याची शक्‍यता आहे.

पहाटे साडेचार वाजण्‍याच्‍या सुमारास हा अपघात झाला आहे. पुणे येथील समारंभात झांज वाजवण्‍यासाठी गेलेले मुंबईतील गोरेगाव येथील बाजीप्रभू झांजपथक मुंबईला परतत असताना हा अपघात झाला. बस साधारण 200 फूट दरीत कोसळली असून मदत कार्य वेगाने सुरू आहे. अपघात ग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी संस्‍थेचे पथक, आयआरबी टीम, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, यशवंती हायकर्स मदत करीत असून लोणावळा येथील शिवदुर्गटीमलाही पाचारण करण्‍यात आलंय. डॉक्‍टरांची टीम रूग्‍णवाहिकांसह घटनास्‍थळी पोहोचली आहे. दुर्गम भाग असल्‍याने मदत कार्यात अडथळे येत आहेत.

जखमींची नावे

1)आशिष विजय गुरव,19 वर्षे, दहिसर मुंबई.

2) यश अनंत सकपाळ, वय 17 वर्ष, गोरेगाव, मुंबई. 3) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 वर्षे, कांदिवली, मुंबई.

4) वृषभ रवींद्र कोरमे, वय 14 वर्षे, गोरेगाव, मुंबई.

5) रुचिका सुनील डुमणे, वय 17 वर्षे, गोरेगाव, मुंबई.

6) आशिष विजय गुरव, वय १९ वर्ष, दहिसर, मुंबई 7)ओंकार जितेंद्र पवार, वय 25 वर्षे खोपोली, रायगड.

8) संकेत चौधरी, वय 40 वर्ष,गोरेगाव, मुंबई. 9)रोशन शेलार, वय 35 वर्ष, मुंबई 10)विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 वर्ष, गोरेगाव, मुंबई

11) निखिल संजय पारकर, वय 18 वर्ष, मुंबई.

12) युसुफ मुनीर खान, वय 13 वर्ष, मुंबई

13) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15 वर्ष, सांताक्रुज, मुंबई

14) अभिजीत दत्तात्रेय जोशी वय 20 वर्षे, गोरेगाव मुंबई.

16) मोहक दिलीप सालप, वय 18 वर्षे, मुंबई.

17) दिपक विश्वकर्मा, वय २०वर्ष, गोरेगाव, मुंबई

18) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम, वय १८ वर्ष, गोरेगाव,मुंबई.

खोपोली नगरपालिका हॉस्पिटल मधील जखमींची नावे

१) नम्रत रघुनाथ गावनुक, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई.

२) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 वर्ष, गोरेगाव, मुंबई ३) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई

४) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 वर्ष, विरार.

५) महेश हिरामण म्हात्रे, वय २० वर्षे, गोरेगाव, मुंबई

६) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई

७) शुभम सुभाष गुडेकर, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई

८)ओम मनीष कदम, १८वर्ष, गोरेगाव, मुंबई.

९) मुसेफ मोईन खान,वय २१ वर्ष, गोरेगाव, मुंबई

खाजगी रुग्णालय जाकोटिया रुग्णालय खोपोली जखमीची नावे:-

१) सनी ओमप्रकाश राघव, वय २१ वर्ष, खोपोली,रायगड.

खालापूर रुग्णालयात मयत नावे.

१) जुई दिपक सावंत, १८ वर्ष, गोरेगाव, मुबई

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com