CRPF
CRPFTeam Lokshahi

CAPF Recruitment 2022 : CRPF, CISF, BSF आणि इतर विभागांमध्ये 84000 जागांची सुवर्णसंधी

डिसेंबर २०२३ पर्यंत ही सर्व रिक्त पदे भरण्याची सरकारची तयारी
Published by :
Team Lokshahi

CRPF Recruitment 2022 : मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs) अंतर्गत 84405 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. आसाम रायफल, BSF (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स), CISF (केंद्रीय उद्योग सुरक्षा दल), CRPF (केंद्रीय) यासह विविध CAPF मध्ये 84405 रिक्त जागा आहेत. ज्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत ही सर्व रिक्त पदे भरण्याची सरकारची तयारी आहे. (capf recruitment 2022 news for crpf cisf bsf)

अहवालानुसार आसाम रायफल्समध्ये 9659 पदे, BSF मध्ये 19254, CISF मध्ये 10918, CRPF मध्ये 29985 पदे, ITBP मध्ये 3187 आणि SSB मध्ये 11402 पदे रिक्त आहेत, ज्यासाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

CRPF
Lucky Feets : जर तुमच्या तळव्याचा आकार असा असेल तर तुम्ही...

विभाग - रिक्त पदे

आसाम रायफल्स - 9659

बीएसएफ - 19254

CISF - 10918

CRPF - 29985

ITBP - 3187

SSB - 11402

CRPF
बाईकमध्ये कमी ऑइलमुळे बसला दंड, काय सांगतोय नियम?

काही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, तर काही पदांसाठी ती लवकरच सुरू होणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2023 पर्यंत ही सर्व रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com