Ajit Pawar Death in Plane Crash : ओह शिट..ओह शिट ! विमान कोसळण्यापूर्वी काही सेकंदापूर्वी कॅप्टन शांभवीचे शेवटचे शब्द
(Ajit Pawar Death in Plane Crash ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला असून या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. यातच आता विमानाच्या पायलटचे शेवटचे शब्द समोर आले आहेत.
लँडिंगच्या काही सेकंद आधी कॅप्टन शांभवी पाठक यांचे ओह शिट..ओह शिट असे म्हणतानाचे शेवटचे शब्द रेकॉर्डमध्ये नोंदवले गेल्याची माहिती मिळत आहे. विमान कोसळण्यापूर्वी काही सेकंदापूर्वी शांभवी ओरडल्या. कॅप्टनने mayday हा कॉल दिला की नाही?, याची आता चौकशी होणार असल्याची माहिती मिळत अलसून विमानात तांत्रिक बिघाड होता की दृश्यमानता नसल्याने अपघात झाला? हे दोन मुद्दे तपासात निर्णायक ठरणार आहेत.
