Siddhivinayak Temple On Alert Mode : रविवारपासून हार, फुलं, नारळ घेऊन जाण्यास बंदी; सिद्धिविनाक मंदिराचा मोठा निर्णय

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात रविवारपासून हार, फुलं, नारळ घेऊन जाण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात रविवारपासून हार, फुलं, नारळ घेऊन जाण्यास बंदी घालण्यात येणार आहे. सिद्धिविनायक मंदिरातर्फे मोठा निर्णय घेतला जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समजते. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन अलर्ट मोडवर असून सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाची उद्या, शुक्रवारी महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे.

काय आहे सविस्तर माहिती

रविवारपासून मंदिरात भाविकांना हार, फुलं, नारळं वाहिली जातात ती वाहता येणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. देशात तणावाचं वातावरण आहे. भारतातील विविध ठिकाणांवर पाकिस्तानची नजर आहे. सिद्धिविनायक मंदिर हे नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिल आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नेहमीच चोख असते. मात्र तरीही कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या, शुक्रवारी मंदिर प्रशासनाकडून पत्रकार परिषद घेऊन केला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com