संजय गायकवाडांवर आणखी एक गुन्हा दाखल! काय आहे प्रकरण?

संजय गायकवाडांवर आणखी एक गुन्हा दाखल! काय आहे प्रकरण?

बुलढाणा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कडून युवकाला बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ नुकताच वायरल झाला आहे.
Published by :
shweta walge

बुलढाणा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कडून युवकाला बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ नुकताच वायरल झाला आहे. नुकतेच आपण वाघाची शिकार करुन त्याचा वाघनख गळ्यात लॉकेट म्हणून घातल्याचा दावा करणारा एका व्हिडिओमुळे अडचणीत आलेल्या गायकवाड यांच्या विरोधात जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच आमदार संजय गायकवाड हे आता आणखी एका नवीन वादात सापडले आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये

आमदार संजय गायकवाड यांचा पुन्हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शिवजयंती मिरवणुकी दरम्यानचा आहे. या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड युवकांना पोलीस काठीने मारहाण करताना दिसत आहे. त्यांच्या बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना सपासप मारहाण ते करत आहेत. त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीत गोंधळ उडाल्याचे दिसत आहे.

सध्या सोशल मीडिया मध्ये वायरल होत असलेल्या व्हिडिओची पुष्टी लोकशाही मराठी करत नाही या बाबतीत आमदार संजय गायकवाड यांचे कडून ही कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com