Baburao Chandere : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलावर गुन्हा दाखल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Baburao Chandere) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण चांदेरे हा बाबुराव चांदेरे यांचा मुलगा असून चांदेरे यांच्या मुलासह इतर 14 जणांवर मतदार संघात मतदारांच्या याद्या घेऊन तसेच मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव चांदेरे हे पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवत आहेत.
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३, कलम १७१ आणि कलम ७४ अन्वये गुन्हा दाखल केला असून बाबुराव चांदेरे यांनी मतदार संघात पैसे वाटले असल्याचा आरोप देखील काल अनेक राजकीय पक्षांनी केला होता.
Summary
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलावर गुन्हा दाखल
किरण चांदेरे हा बाबुराव चांदेरे यांचा मुलगा
मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
