Pune News : पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा समोर! शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यामुळे चर्चेत आलेली खरेदीदार कंपनी अमेडिया इंटरप्राइजेस एल. एल. पी. चे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्री बाबत कुलमुख्यातपत्र असणारी महिला शीतल तेजवानी आणि निलंबित सह दुय्यम निबंधक आर. बी. तारु यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशातच आता पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा समोर आला असून कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शीतल तेजवाणीसह दिग्विजय पाटील यांच्यासह हेमंत गोवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात काल तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन केले आहे. त्यावरून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालच मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणी शितल तेजवाणी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बोपोडी येथील पाच हेकटर शासकीय जमिनीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी जमीन असल्याचा कृषी विभागाचा आदेश असतानाही तो आदेश डावलून जमीन व्हिजन प्रॉपर्टीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

