गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार; राज्य सरकारची घोषणा

गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार; राज्य सरकारची घोषणा

कोरोनाने राज्यात अगदी धुमाकूळ घातला होता. आता कोरोनाच्या दोन वर्षानंतर दहीहंडी आणि गणेशोत्सव हा उत्सव मोठा उत्साहात साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे - फडणवीस सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. गणेशोत्सवात आणि दहीहंडी उत्सवात कायदेशीर सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल गुन्हे लवकरच मागे घेण्यात येणार आहे. गुन्ह्यांचे स्वरूप पाहून गुन्हा मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आले आहे.

गुन्ह्यांचे स्वरूप तपासण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेली समिती याबाबत निर्णय घेणार असून केवळ गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात कायदेशीर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत.सरकारकडून याबाबत शासन आदेश जारी करण्यात आला असून 31 मार्च 2022 पूर्वी दोषारोपपत्र दाखल झालेल्या खटल्यांसाठी हा निर्णय लागू असेल असं स्पष्टपणे त्यात नमूद करण्यात आले आहे.

तसेच गोविंदासाठीसुद्धा एक मोठी घोषणा करण्यात आली ती म्हणजे दहीहंडीच्या खेळाला दर्जा, सरकारी नोकरीतही आरक्षण देण्याची ही घोषणा आहे. तसेच दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.

गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार; राज्य सरकारची घोषणा
ढाकुम्माकुम! दहीहंडीची धूम, यंदा नऊ थरांचा विक्रम मोडणार?
Lokshahi
www.lokshahi.com