CBIची मोठी कारवाई; पंजाब पोलिसांच्या DIGच्या घरात सापडलं मोठं घबाड
थोडक्यात
पंजाब पोलिसांच्या DIGच्या घरात सापडलं घबाड
नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन
CBIची मोठी कारवाई
CBIने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या कारवाईत पंजाब पोलिसांच्या एका डीआयजींच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली आहे. या डीआयजींनी एका स्क्रॅप व्यावसायिकाकडून ८ लाख रुपयांची लाच आणि दरमहा सेवापानी म्हणून हप्ता मागितल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.
सीबीआयने पंजाब पोलिस दलातील रोपड रेंजचे डीआयजी हरचरण सिंह भुल्लर यांना लाचखोरीच्या या प्रकरणात अटक केली असून सीबीआयने सापळा रचत सेक्टर 21 चंडीगड येथे मध्यस्थ कृष्णू याला ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर सीबीआयने कृष्णू याला डीआयजींना फोनही करायला लावला. डीआयजींनी दोघांनाही ऑफीसमध्ये बोलावले.
त्यानंतर सीबीआयच्या टीमने डीआयजी हरचरण भुल्लर यांना त्यांच्याच ऑफीसमधून अटक केली. डीआयजींच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली असून, या नोटा मोजण्यासाठी चक्क मशीन मागवावी लागल्याची माहिती मिळत आहे.
