CBSE SSC and HSC Datesheet 2026 Release
CBSE SSC and HSC Datesheet 2026 Release CBSE SSC and HSC Datesheet 2026 Release

CBSE SSC and HSC Datesheet 2026 Release : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, आता परीक्षेसाठी उरले फक्त 'इतके' दिवस

सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी परीक्षा 2026 ची तारीख जाहीर झाली आहे. या परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी परीक्षा 2026 ची तारीख जाहीर झाली आहे.

  • या परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहेत.

  • बोर्डाने वेळापत्रक चार महिने आधी जाहीर केले आहे.

सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी परीक्षा 2026 ची तारीख जाहीर झाली आहे. या परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहेत. बोर्डाने वेळापत्रक चार महिने आधी जाहीर केले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे.

सीबीएसई बोर्ड

सीबीएसई 10 वी परीक्षा 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 दरम्यान आयोजित केली जाणार आहे, तर 12 वी परीक्षा 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2026 पर्यंत होईल. परीक्षा सकाळी 10:30 ते 12:30 आणि दुपारी 1:30 ते 3:30 या वेळेत घेतल्या जातील. सीबीएसईच्या 26 देशांतील 45 लाख विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य बोर्ड

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 12 वी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 आणि 10 वी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होईल. यंदाच्या वर्षी, दोन्ही परीक्षा एकाच कालावधीत घेण्यात येत आहेत, जे विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरू शकते. दोन्ही बोर्डांनी विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ दिला आहे, ज्यामुळे तयारीसाठी प्रोत्साहन मिळेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com