Online Gaming : ऑनलाईन गेमिंगसाठी केंद्र सरकारकडून नवे नियम जारी; काय आहेत 'हे' नियम वाचा
Admin

Online Gaming : ऑनलाईन गेमिंगसाठी केंद्र सरकारकडून नवे नियम जारी; काय आहेत 'हे' नियम वाचा

ऑनलाईन गेमिंगसाठी केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत.

ऑनलाईन गेमिंगसाठी केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगसाठी नवे नियम जारी केले असून त्याद्वारे कोणत्याही प्रकारचा सट्टा आणि जुगाराला मनाई करण्यात आली आहे.

माध्यमसंस्थांसाठी देखील काही मार्गदर्शक तत्व बनवण्यात आली आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सट्टेबाजी, ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या जाहिरातीं विरुद्ध नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, ऑनलाईन गेमला मान्यता देण्याचा निर्णय या गेममध्ये कोणत्याही प्रकारे बेटिंग किंवा जुगाराचा समावेश नाही, हे लक्षात घेऊन घेण्यात येईल. सट्टेबाजीशी संबंधित प्लॅटफॉर्मचा प्रचार करू नये. ऑनलाईन गेमवर बेट लावली जात असल्याचं SRO ला आढळल्यास, तो त्यास मान्यता देणार नाही. तसेच त्यावर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. बेटिंग आणि जुगाराशी संबंधित जाहिरातींबाबतही सरकारनं इशारा दिला आहे. असे त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com