Ashadhi Ekadashi Special Train: वारकऱ्यांचा प्रवास होणार सुखकर!
Ashadhi Ekadashi Special Train: वारकऱ्यांचा प्रवास होणार सुखकर! 'आषाढी एकादशी' निमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; Ashadhi Ekadashi Special Train: वारकऱ्यांचा प्रवास होणार सुखकर! 'आषाढी एकादशी' निमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय;

Ashadhi Ekadashi Special Train : वारकऱ्यांचा प्रवास होणार सुखकर! 'आषाढी एकादशी' निमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

Ashadhi Ekadashi Special Train : आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेने 80 गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला, वारकऱ्यांचा प्रवास सोईस्कर.
Published by :
Riddhi Vanne
Published on

आषाढी एकादशीनिमित्त देशभरातून दरवर्षी लाखो वारकरी आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपुरमध्ये येत असतात. हे वारकरी शेकडो किलोमीटर अंतर चालत आपली वारी पूर्ण करतात. आता वारकऱ्यांचा प्रवास अधिक चांगला व्हावा, यासाठी प्रशासनाने ही पुढाकार घेतला आहे. एसटी महामंडाळाच्या निर्णयानंतर आता मध्य रेल्वेने सुद्धा वारकऱ्यांच्या सोयीसाठी मराठवाडा ,कर्नाटक ,विदर्भ विभागातून आषाढी एकादशीनिमित्त 1 जुलै ते 10 जुलै या कालावधीत 80 आषाढी विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या वाढीव गाड्यांमुळे वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही.

आषाढी एकादशीनिमित्त प्रत्येक वर्षी लाखोंचा जनसागर पंढरपूरमध्ये पाहायला मिळतो. यासाठी शासन आणि प्रशासनही भाविकांच्या सेवेसाठी दरवर्षी सज्ज असतात.यंदाच्या वर्षी सुद्धा राज्य सरकारने पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या वाहनांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटी ,महामंडळाने ही ज्यादाच्या एसटीची सोय केली. त्याबरोबरच मध्य रेल्वेने सुद्धा ज्यादा 80 गाडयांची सोय केल्यामुळे विठ्ठलाच्या भक्तांचा पंढरपूरपर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे. पुणे,नागपूर,अमरावती, कलबुर्गी, भुसावळ अशा अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरुन या रेल्वे गाड्या धावणार आहेत. कर्नाटक राज्यातून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी देखील विशेष गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे.

रेल्वेचे आरक्षण IRCTC च्या संकेतस्थळावर उपलब्ध

या विशेष गाड्यांमुळे वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीसाठी सोईस्कर आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.16 जूनपासून या आषाढी विशेष ट्रेनचे आरक्षण सुरू होणार असून प्रवाशांना विशेष शुल्कासह हे आरक्षण करता येणार आहे . हे आरक्षण IRCTC च्या संकेतस्थळावर तसेच सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असेल, अशी माहिती मध्यरेल्वे प्रशासनाने दिली आहे. लवकरात लवकर आपले तिकीट आरक्षित करून या पवित्र वारीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या धार्मिक सोहळ्याला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये. यासाठी विशेष तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यंदाच्यावर्षी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com