Central Railway : मध्य रेल्वेचे वेळापत्रक बदलले! मुंबई–लातूर, नागपूर, अमरावती मार्गावरील गाड्यांच्या वेळांत महत्त्वाचे फेरबदल

Central Railway : मध्य रेल्वेचे वेळापत्रक बदलले! मुंबई–लातूर, नागपूर, अमरावती मार्गावरील गाड्यांच्या वेळांत महत्त्वाचे फेरबदल

मुंबईहून लातूर, नागपूर आणि अमरावतीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Central Railway ने एप्रिल महिन्यापासून काही प्रमुख रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल जाहीर केले आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबईहून लातूर, नागपूर आणि अमरावतीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Central Railway ने एप्रिल महिन्यापासून काही प्रमुख रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल जाहीर केले आहेत. रेल्वे ट्रॅकचे अपग्रेडेशन, इंजिनमध्ये सुधारणा आणि नवतंत्रज्ञानाच्या वापरामुळे गाड्यांचे संचालन अधिक सुरक्षित व सुलभ करण्यासाठी हे बदल करण्यात आले असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हे नवीन वेळापत्रक १४ एप्रिलपासून (दुरांतो व विदर्भ एक्स्प्रेस) आणि १५ एप्रिलपासून (गरिब रथ व पुणे-नागपूर एक्स्प्रेस) लागू होणार आहे. काही गाड्यांच्या स्थानकांवरील आगमन व प्रस्थान वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

महत्त्वाचे बदल

गाडी क्र. १२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ रात्री ८.०५ ऐवजी ८.५० करण्यात आली आहे.

गाडी क्र. १७३१८ दादर-हुबळी एक्स्प्रेस, ११३०१ मुंबई-बेंगळुरू एक्स्प्रेस, २२१०८ लातूर-मुंबई एक्स्प्रेस, १२११६ सोलापूर-मुंबई एक्स्प्रेस आणि २२१४४ बिदर-मुंबई एक्स्प्रेसच्या वेळांमध्येही बदल झाले आहेत.

दुरांतो आणि नागपूर मार्गावरील बदल

सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ रात्री ७.५५ ऐवजी ८.३५ करण्यात आली आहे. परिणामी ही गाडी नागपूरला सकाळी ८.०५ ऐवजी ७.५० वाजता पोहोचेल. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ रात्री ८.३० ऐवजी ७.५५ करण्यात आली असून ती मुंबईला सकाळी ८.२० वाजता दाखल होईल.

पुणे-नागपूर गरिब रथ व पुणे-नागपूर एक्स्प्रेस आता सकाळी ९.१० ऐवजी ९.२० वाजता नागपूरला पोहोचेल.

  • CSMT–बेंगळुरू एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 11301)

(१४ एप्रिल २०२६ पासून लागू)

CSMT प्रस्थान: सकाळी ७.५५ (पूर्वी ८.१०)

दादर आगमन: ८.०७, प्रस्थान: ८.१०

कल्याण आगमन: ८.४२, प्रस्थान: ८.४५

  • लातूर–CSMT एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 22108)

    (१३ एप्रिल २०२६ पासून)

CSMT आगमन: सकाळी ८.०० (पूर्वी ७.५५)

  • सोलापूर–CSMT एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 12116)

(१३ एप्रिल २०२६ पासून)

CSMT आगमन: सकाळी ६.३० (पूर्वी ६.३५)

  • बिदर–CSMT एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 22144)

(१६ एप्रिल २०२६ पासून)

CSMT आगमन: सकाळी ८.०० (पूर्वी ७.५५)

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे. या बदलांमुळे काही गाड्यांचा प्रवास कालावधी कमी होणार असून वेळेची अचूकता वाढण्याची अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com