Mumbai Local Central Line
Mumbai Local Central LineTeam Lokshahi

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, तांत्रिक बिघाडामुळे वेळापत्रक कोलमडलं

मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. भल्यापहाटे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडाने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे.

गिरीश कांबळे : मुंबई | मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. भल्यापहाटे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडाने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे कल्याणकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या जवळपास 20 ते 25 मिनिटांनी उशीराने धाव आहे.

याशिवाय सीएसएमटीकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या मुंबई लोकलचा सकाळपासून खोळंबा झालेला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून त्यामुळे प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत राहावं लागत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com