बातम्या
राहुल गांधींच्या खासदारकीवर निकालाची शक्यता, कोर्टानं दोषमुक्त सिद्ध केल्यास पुन्हा खासदारकी मिळणार
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमध्ये मोदी आडनावाबाबत वक्तव्य केलं होतं.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमध्ये मोदी आडनावाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुजरातमधील भाजप आमदारानं राहुल गांधींविरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता.
राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. यावरच आज सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोर्टानं राहुल गांधींना दोषमुक्त सिद्ध केल्यास पुन्हा खासदारकी मिळणार. कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.