धक्कादायक! 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल; विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न?

धक्कादायक! 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल; विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न?

मोहालीतील एका खासगी विद्यापीठात घातला विद्यार्थिनींचे आंदोलन

चंदीगड : पंजाबमधील मोहाली येथील एका खासगी विद्यापीठात एक धक्कादाक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहातील मुलींचे आंघोळ करतानाचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली आहे. ही बाब समोर येताच काही तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे विद्यापीठात एकच गोंधळ उडाला असून विद्यार्थिनी आंदोलन करत आहेत.

माहितीनुसार, मोहालीत चंदीगढ युनिव्हर्सिटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास विद्यापीठाच्या वसतिगृहाबाहेर काही मुलींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आंदोलकांचा आरोप आहे की, एका विद्यार्थिनीने अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल केला. या घटनेनंतर काही विद्यार्थिनींनी आत्महत्येचाही प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही केवळ सोशल मीडियावरील अफवा असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून याप्रकरणी आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, कोणत्याही विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेला नाही, असे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणाले आहेत. केवळ एक विद्यार्थिनी बेशुद्ध झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय एमएमएस बनवणाऱ्या आरोपी विद्यार्थिनीलाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती सायबर क्राइम ब्रँचला देण्यात आली असून, आता आरोपीची चौकशी सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com