Chandrababu Naidu Arrest: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक; कारण काय?

Chandrababu Naidu Arrest: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक; कारण काय?

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी आपल्या दौऱ्यादरम्यान नांदयाल जिल्ह्यातील बनागनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केलं होतं. शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास, नायडू यांना अटक करण्यासाठी एपी सीआयडी आले.

नायडू यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीनं अटक केली. आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.पोलीस अधिकार्‍यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना कौशल विकास प्रकरणात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयानं जारी केलेल्या एफआयआर प्रत आणि इतर आदेशांची माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com