" त्या " फोटोने ब्रिटीशांचे फोटोसेशन आठवले ; वनविभागाचा फोटोवर वन्यजीव प्रेमी नाराज

" त्या " फोटोने ब्रिटीशांचे फोटोसेशन आठवले ; वनविभागाचा फोटोवर वन्यजीव प्रेमी नाराज

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या जंगलात हल्लेखोर ठरलेल्या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे.हा वाघ जेरबंद झाल्याने ग्रामस्थ दहशतीतून मुक्त झालेत. वनविभागाची कामगिरी प्रसंशनीय ठरली हे ही खरे.

अनिल ठाकरे, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या जंगलात हल्लेखोर ठरलेल्या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे. हा वाघ जेरबंद झाल्याने ग्रामस्थ दहशतीतून मुक्त झालेत.वनविभागाची कामगिरी प्रसंशनीय ठरली हे ही खरे.मात्र या आनंदाचा भरात वनविभागाने केलेल्या फोटोसेशनवर वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या प्रकारे वनविभागाने फोटोशेसन केलेत त्याप्रकारे स्वातंत्र्यपुर्व भारतात वाघाची शिकार केल्यावर केले जायचे.आनंदाचा भरात कायदा विसरणाऱ्या वानविभागावर टिकेची झोड उडाली आहे.

जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचा जंगलात टी-103 या नर वाघाचा तीन मोठ्या हल्यात मानवी बळी गेला. जून महिन्यापासून या वाघाच्या हल्ल्यात या भागात तीन मोठ्या हल्ल्यात ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता. खरीप पिकांच्या पेरणी व देखभालीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना वाघाने लक्ष्य केले होते. त्यामुळेच नागरिकांमधील संताप लक्षात घेता मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी 17 ऑगस्ट रोजी या वाघाला पिंजराबंद करण्याचे आदेश दिले होते. गुरूवारला सकाळी ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील जंगलातल्या भगवानपुर येथील कक्ष क्रमांक 890 मध्ये हा वाघ फिरताना आढळला होता. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे व सशस्त्र पोलीस कर्मचारी अजय मराठे यांनी नेमका डार्ट मारून अडीच वर्षाच्या या नर वाघाला बेशुद्ध केले. या वाघाची वैद्यकीय तपासणी करून त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात हलविल्या गेले. वाघ जेरबंद झाल्यानंतर ब्रह्मपुरी शहरालगतच्या शेतशिवारात नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

मात्र या वाघाला जेरबंद केल्यावर झालेले फोटोसेशन समाजमाध्यमात वायरल झाले.बेशुध्द पडलेल्या वाघाचा पाठीमागे उभे राहून अनेकांनी सेल्फी घेतली.कायद्या अश्याप्रकारचा कृतीला समर्थन देतोय काय ? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.हा फोटो बघून ब्रिटीशांचे वाघाचा शिकारीचा फोटोसेशनची आठवण झाल्याची भावना काही वन्यजीवप्रेमींनी समाजमाध्यमात व्यक्त केली.

Lokshahi
www.lokshahi.com