एका चोरामुळे गावात पाणीटंचाई..! चोराने
नेमकं काय केलं ?

एका चोरामुळे गावात पाणीटंचाई..! चोराने नेमकं काय केलं ?

चोरीच्या अनेक घटना अधूनमधून घडत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar

अनिल ठाकरे, चंद्रपूर

चोरीच्या अनेक घटना अधूनमधून घडत असतात. मात्र एका चोराने केवळ पाच रुपयासाठी वाटर एटीएम फोडले. हा प्रकार जिल्हातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावात घडली. चोराचा या कृतीने गावात शुद्ध पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाच रुपयासाठी एटीएम फोडणाऱ्या या चोराचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.

शासनाने "गाव तेथे वॉटर एटीएम " हा उपक्रम राबवीला. या एटीएमच्या माध्यमातून पाच रुपयात गावाकऱ्यांना शुद्ध आणि थंड पाणी मिळत असते. उन्हाळ्यात अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली असताना वॉटर एटीएमच्या माध्यमातून गावकरी आपली तहान भागवीत आहेत. मात्र आता या एटीएमवर चोरांची नजर पडली आहे.वॉटर एटीएम फोडल्याची घटना जिल्हात घडली आहे.

सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे ही घटना घडली आहे.ग्रामपंचायत कार्यालय वासेरा अंतर्गत चार महिन्यांपूर्वी थंड आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी "वॉटर एटीएम” सुरू कण्यात आले होते ."गाव तेथे वॉटर एटीएम या शासनाच्या अभियानात जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत मागील एक वर्षापासून वॉटर एटीएमचे काम सुरू होते. चार महिन्यांपूर्वी वासेरा येथील वॉटर एटीएम मशीन सुरू करण्यात आली होती .या एटीएम मधून गावाकऱ्यांना थंड आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळू लागले.या एटीएम पाच रुपयांचे नाणे टाकून नागरिकांना पंधरा लीटर पाणी विकत घेता येत होते.

या एटीएमवर भुरट्या चोरांची नजर पडली. चोरांनी पाच रुपयासाठी वॉटर एटीएम मशीन फोडली अन पाच रुपये पाळविले.चोरांचा या कृतिमुळे वॉटर एटीएम मशीन बंद पडली आहे. परिणामी शुद्ध आणि थंड पाण्यापासून गावकरी वंचित झाले आहेत. गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाच रुपयासाठी एटीएम फोडणाऱ्या या चोराची चर्चा जिल्हात सुरु आहे. सरपंच महेश बोरकर, पोलिस पाटील देवेंद्र तलांडे यांनी चोरीच्या घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली.पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com