Chandrashekhar Bawankule: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, कोराडी महालक्ष्मी ते आयोध्यावारी सुरु
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कोराडी महालक्ष्मी ते आयोध्यावारी सुरु झाल्याच चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. हा आज याचा शुभारंभ झाला असून 15 तारखेला या यात्रेची दुसरी बस रवाना होणार आहे. याचपार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोराडी महालक्ष्मी जगदंबाच्या संस्थानाच्या वतीनं आम्ही कालांतराने मुख्यमंत्री यात्रा दर्शन योजनेमध्ये कोराडी महालक्ष्मी ते आयोध्या अशी आम्ही वारी सुरु करत आहोत, आणि आज याचा शुभारंभ झाला आहे.
1 तारखेला आणि 15 तारखेला अशा दोन बस जातील आणि 4 दिवसांचा हा प्रवास असणार आहे. आम्ही मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये या यात्रेत जाणाऱ्या सर्वांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच राहण्याची देखील व्यवस्था यात करण्यात येणार आहे. या वारीसाठी 100 लाडक्या बहिणी सहभागी होतील.
आमदारांनी सरकारवर विश्वास ठेवावा काय म्हणाले बावनकुळे
मीडियामध्ये एखाद्याबद्दल बोलण्यापुर्वी मुख्यमंत्री हे काय तपास झाला आहे कोणत्या प्रकारची कारवाई झाली आहे सरकार त्या घटनेच्या तपासासाठी काय करत आहेत यासर्व गोष्टींबद्दल आमदारांनी जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळे मीडियासमोर आपण काहीही बोलताना त्याचा परिणाम तपासावर होणारा नाही याची काळजी घ्यावी. कोणतीही गोष्ट बोलण्यापुर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून घ्यावं जेणे करून चांगले मार्ग निघू शकतात.
...म्हणून पोलिस नियंत्रणेला तपास करण्यासाठी थोडा वेळ लागतो- चंद्रशेखर बावनकुळे
बीड प्रकरणातला कोणताच आरोपी हा सुटणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. कोणताही गुन्हा दाखल करण्यापेक्षा तो योग्यरित्या पुराव्यांसह उघडकीस आणुन आरोपीला शिक्षा देणे हे सोपे नसते. त्यामुळे सरकारला आणि पोलिस नियंत्रणेला तपास करण्यासाठी थोडा वेळ लागतो. आमच्यावर विश्वास ठेवा कोणाला ही सोडणार नाही आरोपीला योग्य ती शिक्षा देण्यात येईल.