उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादीने जादूटोणा केलाय - चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादीने जादूटोणा केलाय - चंद्रशेखर बावनकुळे

साताऱ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली

प्रशांत जगताप, सातारा

साताऱ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत मागील सरकारमधील रखडलेली कामे मार्गी लावण्यात येतील असे सांगत शिवप्रताप दिन उत्सव समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांनी प्रतापगड येथील कबर परिसरातील अतिक्रमण हटवण्यात जो लढा दिला त्याचे कौतुक केलय. तर मतांचे राजकारण करण्याकरिता हे अतिक्रमण काढण्यास उद्धव ठाकरे यांची हिम्मत झाली नाही असे सांगत या सरकारचे अभिनंदन केलंय

उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गुलाम झालेत या बातम्यांना महत्व द्यायचं नाही. सत्ता गेली की ते प्रचंड अस्वस्थ आहेत. सत्तेतून ज्यांनी पैसा कमावला ते घाबरले आहेत. आमचं सरकार काम करत नाही तर कोर्टाकडून ऑर्डर आणा असे सांगत हे केवळ बोलघेवडे आहेत असे सांगत महाविकास आघाडीवर टीका केलीये.

राष्ट्रवादी चे घड्याळ बारामती मध्ये बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे..त्या दृष्टीने आम्ही काम करू.अजित दादा नेमके काय करतील हे कोणालाच कळणार नाही ते त्यांनाच माहीत असतं. जयंत पटलांनी सत्तेच स्वप्न सोडून दिले पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता खास करून राष्ट्रवादीने केला होता. शरद पवारांच्या ताब्यात कोण आला तर तो सुटत नाही असे सांगून शरद पवार भोंदूबाबा आहे असा टोला शरद पवारांना लागवलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com