राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 17 तारखेला पंतप्रधान मोदीजी यांची शिवाजी पार्कला रॅली आहे. त्या रॅलीमध्ये माननीय राजसाहेब यावे अशी देवेंद्रजी, आशिष शेलारजी आणि मी स्वत: राज्याचा अध्यक्ष म्हणून राजसाहेबांनी निमंत्रित करायला आलो आहे. राज साहेबांनी निमंत्रणही मान्य केलं आहे.

राज्याच्या एकंदरीत निवडणूका आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणूका यामध्ये राज साहेबांचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे. मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याची भूमिका राज साहेबांनी केली आहे. त्यांचे भेटून आभारही व्यक्त करायचे होते. मुंबईच्यासुद्धा या निवडणूका आहेत त्यामध्येही त्यांची भूमिका महत्वाची आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, नाशिकमध्येही महत्वाची आहे. त्यांनी ज्या पद्धतीने पुण्यामध्ये आव्हान केलं. मोठा फायदा आम्हाला त्याठिकाणी पुण्यामध्ये झालं आहे. राज साहेबांच्या एकंदरित भूमिकेमुळे महाराष्ट्रामध्ये आम्हाला महायुतीला बळ मिळालं. पुढच्या काळातही महायुतीला त्यांचं बळ मिळेल. ही अपेक्षा आम्हाला आहे. राजसाहेब 17 तारखेला मोदीजींच्या सभेत त्यांची भूमिका ते मांडणारच आहेत. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com