'शरद पवारांना या वयात षडयंत्र करणे शोभत नाही' बेकायदेशीर सरकारवरून बावनकुळे यांचा पवारांना टोला

'शरद पवारांना या वयात षडयंत्र करणे शोभत नाही' बेकायदेशीर सरकारवरून बावनकुळे यांचा पवारांना टोला

राज्यातील शिंदे फडणवीस व पवार सरकार बेकायदेशीर सरकार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केले होते. याबाबत शनिवारी संवाद यात्रेनिमित्त भिवंडीत आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता
Published by :
shweta walge

राज्यातील शिंदे फडणवीस व पवार सरकार बेकायदेशीर सरकार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केले होते. याबाबत शनिवारी संवाद यात्रेनिमित्त भिवंडीत आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता 2019 मध्ये राज्यात अस्तित्वात आलेले सरकार हे कायदेशीर होते का? असा सवाल करत त्यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन बेकायदेशीर सरकार स्थापन केले होते. शरद पवार यांचा पक्ष २०१९ मध्ये चौथ्या स्थानावर असतानाही सत्तेत होता, त्यामुळे शरद पवार यांनी आताचे सरकार बेकायदेशीर म्हणणे चुकीचे असून शरद पवारांना या वयात षडयंत्र करणे शोभत नाही,देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला व आमच्या सोबत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी घेऊन स्वतः बेकायदेशीर सत्ता स्थापन केली अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांच्या प्रतिक्रियेवर केली आहे.

संवाद कार्यक्रमानंतर सुपर वॉरियर्स यांच्याशी संवाद साधण्याअगोदर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे मिशन 2024 याबाबत बावनकुळे यांनी पत्रकारांना माहिती दिली.प्रत्येक पक्ष आपआपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्नशील असतो इतर पक्षांबरोबर भाजप देखील त्याबाबत प्रयत्नशील असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री बाबतच्या मी पुन्हा येईन या सूचक ट्विट बाबत विचारले असता हा ट्विट अती उत्साही कार्यकर्त्याने केला असून तो जुना व्हिडीओ असल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com