'खरा पनवती कोण, हे आज कळालं' विधानसभा निवडणुकीच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

'खरा पनवती कोण, हे आज कळालं' विधानसभा निवडणुकीच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. यामधील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे.
Published by :
shweta walge

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. यामधील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. यावरच तीन राज्यात यश मिळालं महाराष्ट्र सुद्धा अशाच पद्धतीचा वातावरण आहे. महायुती 45 च्या वर जागा निवडून येतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले बावनकुळे ?

तेलंगणात काय झालं. तेलंगणामध्ये कुठली ईव्हीएम मशीन गेली होती. काँग्रेस पार्टीने पंतप्रधान मोदीजींना पनवती म्हटलं. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. जनतेने दाखवून दिलं पनवती कोण आहे. राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने पराभव झाला. छत्तीसगडमध्ये विश्वास दाखवला. शिवराज सिंग चव्हाण, वसुंधरा राजे आहेत. छत्तीसगडमध्ये बघा आदिवासी सदस्य निवडून आले. मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात 18 पगड जातीयांनी भाजपला मतदान केलं. मोदीजींवर लोकांचा विश्वास आहे. जेव्हा काँग्रेस निवडून तिथे तेव्हा ईव्हीएम खराब नसते.

काँग्रेस पार्टीने या पद्धतीने 65 वर्ष भ्रष्टाचार आणि समाजाच्या गरीब कल्याण्याकरता कुठलेही काम केलं नाही. मोदीजींनी साडेनऊ वर्षात या कामाचा हा विश्वास आणि विजय आहे. या कामाला मत मिळाले आहे.

मोदीजीच्या स्वच्छ सरकारला जनतेने मतदान केला आहे देशात साडेतीनशेच्यावर खासदार भाजपचे निवडून येतील महाराष्ट्र 45 प्लस खासदार निवडून येतील हा मोठा विजय होईल.

महिला मतदाराचा मी अभिनंदन करतो. मोठ्या प्रमाणात मतदार या पंतप्रधान नरेंद्र यांच्या पाठीशी उभे आहे. आज या निकालामध्ये दिसत आहे. देशात साडेतीनशेच्यावर आणि महाराष्ट्रात 45 प्लस खासदार विधानसभेत सभा 200 आमदार महाराष्ट्रात निवडून येतील. प्रचंड ताकतीने या महाराष्ट्रात विजय प्राप्त करेल. या तिन्ही राज्याच्या निकालावरून दिसत आहे. जनता नरेंद्र मोदी सोबत आहे. मोदी वर टीका करन जनतेला आवडत नाही

मागील दोन महिन्यात 47 हजार लोकांना भेटलो 16 लोक सोडले. तर सगळ्यांनी सर्वसामान्य महिला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होते असं म्हटलं महाराष्ट्रातील 90% हे भाजपसोबत आहे. भाजप मतदानाच्या माध्यमातून कर्ज घेते आणि ते विकास कामातून ते कर्ज फेडते.

दरम्यान, वर्ल्ड कप फायनल मॅच भारतीय क्रिकेट संघ हारल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक विधान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यामुळे ही मॅच भारत हारला. ते पनौती आहेत, असं विधान राहुल गांधी यांनी केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com