Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार असं सांगून तुम्ही काँग्रेसला तर ‘कवडीमोल‘ ठरवून टाकलं

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार असं सांगून तुम्ही काँग्रेसला तर ‘कवडीमोल‘ ठरवून टाकलं

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्रात मोदींचं नाणं नाही तर फक्त माझं नाणं चालणार अशी दर्पोक्ती आणि अहंकाराची भाषा आज उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंचं नाणं खोटं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात बघितलं. महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार असं सांगून तुम्ही काँग्रेसला तर ‘कवडीमोल‘ ठरवून टाकलं.

खरं तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मोठ्या कष्टानं शिवसेनेच्या नाण्याला सुवर्ण झळाळी मिळवून दिली, पण तुम्ही सोनिया गांधींची गुलामी स्वीकारून तुम्ही तुमच्या नाण्याची गारगोटी करून घेतली.

बाकी आज कधी नाही ते तुम्ही लोकलनं प्रवास केला, यावेळी मुंबईकरांशी चर्चा केली असती तर तुम्हाला ‘मोदी की गॅरंटी‘ या नाण्याचा खणखणीत आवाज ऐकू आला असता. देशातील जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे. महाराष्ट्रातही ‘मोदी की गॅरंटी‘च चालणार. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com