बावनकुळेंचा विरोधकांना इशारा; म्हणाले, "वाचाळविरांनी औकातीत..."

बावनकुळेंचा विरोधकांना इशारा; म्हणाले, "वाचाळविरांनी औकातीत..."

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर असताना वाचाळविरांचा दिला आहे. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर देखील भाष्य केले आहे. तर मकाऊ प्रकरणावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.
Published by :
shweta walge

वाचळवीरांनी औकतीत बोलाव, महाराष्ट्र संस्कारमय आहे, देव, देश, धर्म संस्कृती जपणारा आहे. इतर काही बोलण्यापेक्षा राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी बोलले पाहिजे असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर असताना वाचाळविरांचा दिला आहे. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर देखील भाष्य केले आहे. तर मकाऊ प्रकरणावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.

पंकजा मुंडेंबद्दल बोलताना ते म्हणाले की, पंकजा मुडे यांच्या नेतृत्वाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या नाराजीने विरोधकांचा काही फायदा होईल असे अनेकांना वाटते. पण पंकजाताईंच्या रक्तारक्तात भाजप आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तुत्वाने उभा राहिलेला महाराष्ट्रात पंकजाताई कधीही नाराज राहू शकत नाहीच. खरं तर पक्ष हा मोठा आहे. पंकजाताई पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. निश्चितपणे पंकजा ताई महाराष्ट्रात आणि देशात चांगल्या लेव्हलला नेतृत्व करतील अशी अपेक्षा आहे. असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, लोकसभेच्या कामासाठी आलो आहे. सुपर वॉरियर्स लोकांच्या घरी जाऊन पंतप्रधान मोदींचे कार्य समजावून सांगतील. ज्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांना योजनेचा लाभ कसा देता येईल ते बघणार आहोत. सन २०२४ मध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. तसेच राज्यात महायुतीचे ४५ प्लस खासदार निवडून येतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापेमारी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना भाजपा विधान परिषदेवर संधी देईल, असं बोललं जात होतं. परंतु, पंकजा मुंडे यांना पक्षाने ती संधी दिली नाही. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com