चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, ट्वीट करत म्हणाले, "भूमिका घेता येत नाही..."

सरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झालीय.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर सोशल मीडियावरुन पलटवार केलाय.उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे संभ्रम, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीचं प्रदर्शन असल्याची त्यांनी टीका केली.

ट्वीट करत काय म्हणाले बावनकुळे ?

अरे कहना क्या चाहते हो? उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाले.

संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे. तुमचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ आता पूर्ण झाले आहे. एकीकडे त्यांना साधी भूमिका घेता येत नाही आणि दुसरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झालीय.

अरे कहना क्या चाहते हो? असा उच्चार तुम्ही केलात, पण नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राला, ही पत्रपरिषद ऐकल्यावर तुमच्या बाबतीत पडला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com