सातबारा उताऱ्यांवरील चुकांची दुरुस्तीसाठी भूमिअभिलेख विभगाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलम 155 च्या वापराबाबत आता दुरुस्ती केली आहे. या कलमाअंतर्गत आता फेरफार नोंदणी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाणार आहे. जाणून घेऊया हे नवीन बदल काय आहेत ते?
तलाठ्याच्या लॉगिनवर आदेश प्राप्त झाल्यानंतर, त्या आदेशाची नोंद कुणी, कधी आणि कशी केली याची ऑनलाईन पडताळणी केली जाणार आहे.
फेरफार नोंदी एकाच दिवसात ऑनलाईन प्रणालीत करणे बंधनकारक असणार आहे. मात्र महसूल कार्यालयातील इतर प्रक्रिया मात्र विहित मुदतीनुसार पार पाडाव्या लागतील.
कलम 155 अंतर्गत यापुढे सर्व आदेश फक्त ऑनलाईन स्वरूपात दिले जातील. कुठल्याही स्वरूपात ऑफलाइन फेरफार करण्यास सक्त मनाई आहे.
महसूल न्यायालय किंवा अर्थन्यायिक न्यायाधिकरणांद्वारे दिले जाणारे आदेशही ऑनलाईन प्रणालीतच नोंदवले जाणार आहेत.