School Bus : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! ; 'या' कारणामुळे स्कूल बस तपासणी रखडली
राज्यातील स्कूल बसेस बाबत महत्त्वाची बातमी आहे, राज्यातील हजारो स्कूल बसेस School Busची जी योग्यता तपासणी चालू होती. ती आता थांबवण्यात आली आहे. कारण राज्यातील स्कूल बस ना यूनी UNI नंबर अनिवार्य केल्यामुळे ही तपासणी थांबल्याचे सांगण्यात आले. कारण या यूनी नंबरसाठी जो काही खर्च अपेक्षित आहे. तो खर्च करण्यास कोणीही तयार नसल्यामुळे ही योग्य तपासणी थांबवण्यात आलेली आहे. यामुळे वेग प्रणालीचे प्रमाणपत्र नसलेल्या बसमध्ये विद्यार्थ्यांची ये-जाण करण्याची शक्यता आहे. यामुळे शाळा सुरू होण्याच्या मार्गावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे .
राज्यातील प्रत्येक स्कूलबसच्या वेग नियंत्रण प्रणालीसाठी एक नवीन युनायटेड आयडेंटिफिकेशन (UIDAI) क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे. आणि त्यानुसार स्कूल बसेसची तपासणी केली जात आहे. मात्र या तपासणीसाठी लागणारा १० हजार इतका खर्च करण्यासाठी कोणताही वाहनचालक तयार नसल्याने ही तपासणी थांबली आहे. राज्यांमध्ये 31 मार्च 2024 च्या दरम्यान 36 हजार 558 स्कूल बसची नोंदणी झाली होती. दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची ने - आण करण्यासाठी स्कूल बसेस धावत आहेत. प्रत्येक बस चालकाला योग्य तपासणीसाठी कंपनीकडून वेगनियंत्रण प्रणालीचे प्रमाणपत्र आरटीओमध्ये सादर करावे लागते. त्यानंतरच योग्यता प्रमाणपत्र मिळते, मात्र यासाठी नवीन युनी नंबर आवश्यक आहे. त्यासाठी दहा हजारांचा खर्च करावा लागतो. तो वाहक चालकांना परवडण्यासारख्या नाही. त्यामुळे राज्यातील हजारो स्कूलबसेस योग्य तपासणी थांबली आहे.
याच पार्शवभूमीवर राज्यातील स्कूल बस School Bus च्या वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मात्र तपासणी नसलेल्या स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांना पाठवणे सध्या धोकादायक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवीन यूएनआय UNI क्रमांकासाठी दहा हजाराचा खर्च आम्हाला परवडण्यासारखा नसून, त्यामुळे परिवहन खात्याने जुना नंबर अद्ययावत करून 16 क्रमांकाचा करून द्यावा अशी मागणी स्कूल व्हॅन चालक संघटनेचे अध्यक्ष अफसर खान यांनी केली आहे.